Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.!

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.!

एका सच्चा भिमसैनिकाच्या प्रामाणिक कार्याची सरकारने घेतली दखल

वैभववाडी | प्रतिनिधी: मागील २५ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे.तानाजी कांबळे हे अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी,विकासासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रतिवषीऀ अत्यंत महत्त्वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जातो.
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. महापुरुषांच्या विचारांवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. गेली २५ वर्ष ते पत्रकारितेमध्ये कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केलेली आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून तानाजी कांबळे यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी जिवाची पर्वा न करता संघर्ष केलेला आहे.अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम ते अविरत करीत आहेत .शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर घटकांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्त आहेत. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठवला होता. तंटामुक्त समितीचे ते अध्यक्षही होते त्यांच्या कारकिर्दीत गावात एकही तंटा बखेडाची नोंद नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे ते पदाधिकारी आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा, भवतु सब्ब मंगलम आदी नामवंत संस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन तानाजी कांबळे यांना सन्मानित केलेले आहे.मुंबईतील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, महापालिका कामगारांच्या प्रश्नावर ते सतत काम करीत असतात.


दारूबंदी, अंधश्रद्धा, अपंग,मनोदुबऀल, मतिमंद, वृद्धांसाठी, तसेच वंचित उपेक्षित घटकासाठी, केलेल्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तानाजी कांबळे यांना जाहीर केला आहे.


ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहिर झाल्यानंतर युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे,जयवंत तांबे, निलेश गद्रे,ॲड.संदीप जाधव,भीम शाहीर जनिकुमार कांबळे, विश्वनाथ कदम, सिध्दार्थ म्हस्के,बाळकृष्ण कोकीसरेकर, समाजभूषण पत्रकार राजू झनके, समाजभूषण प्रकाश जाधव,समाजभूषण उत्तम दादा गायकवाड, रवी गरुड, भीमराव संवाद कर,बाळकृष्ण चिंचवलकर,रतन अस्वारे,पत्रकार संजय बोपेगावकर, पत्रकार निलेश मोरे, पत्रकार संजय गिरी, पत्रकार हरिचंद्र पाठक, पत्रकार मनोज कदम,कुवैत येथुन संजय आनंद आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. या पुरस्काराने माझ्या मातीमोल जीवनाचे सोने झाले आहे. वादळ, वाऱ्यात, मी पाय रोवून मी ना भाला ,ना फरशी, ना गाव पाहिजे, पण… तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे.! या जिद्दीने आणि स्फूर्तीने मी निप:क्ष,निर्भीड, निस्वार्थ भावनेने काम करीत राहिलो.माझ्या कठोर परिश्रमाची,योगदानाची, समर्पणाची राज्य सरकारने दखल घेतल्याबद्दल, मी मायबाप सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो, पुरस्काराचा हा सोनेरी क्षण मी कृतज्ञतेच्या भावनेने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवेन. अश्या भावना व्यक्त केल्या.

rapan bottom