Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

निवती | समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा

निवती | समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मालवण: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा मुंबई मंत्रालय येथे आज १० जुन रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.

पर्यटन महामंडळानेच निवती समुद्रावर मोहर उमटविली आहे. यामुळे मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यांच्या सागरी पर्यटन विकासासाठी नवे दालन खुले होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनानेही महत्वपूर्ण सहकार्य केले आहे. गुलदार युद्धनौका समुद्र तळ नेण्याचे काम माझगाव डॉक या एजन्सीला देण्यात आले आहे. सागरी हवामानाचा अंदाज घेऊन ही नौका निवती समुद्र तळाशी स्थापित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पर्यटन महामंडळाच्या आराखड्या या प्रकल्पाचा समावेश होता. जल प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक काढून टाकल्या नंतरच ही युद्धनौका निवती रॉक परिसरात समुद्राच्या तळाशी आर्टिफिशल रिप आणि अंडरवॉटर म्युझियम साठी स्थापित केली जात आहे.

मुंबई येथील या कार्यक्रमासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, आमदार दिपक केसरकर, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख उपस्थिती प्रधान सचिव (पर्यटन) डॉ. अतुल पाटणे, संचालक, पर्यटन संचालनालय डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग डॉ. माणिक दिवे, व्यवस्थापकीय संचालक, म.प.वि.म मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग मोहन दहीकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक कोकण संजय ढेकणे, वरिष्ठ व्यवस्थापक (जलपर्यटन) क्षिप्रा बोरा, प्रादेशिक अधिकारी कोकण विभाग दिपक माने यांनी केले आहे.

महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त करून देणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि एकूणच महाराष्ट्रातील स्कुबा डायव्हिंगचा अनुभव उच्च दर्जाचा बनवण्याचा मानस आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी आणि निधी मिळाला आहे. देशातील पहिला प्रकल्प भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, निवृत्त जहाजांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण संवर्धनास मदत करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. हा पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारा आहे.

rapan bottom