दादा गावडे यांच्या घरा नजीक 'राजा रुक्मांगत' हे संयुक्त नाटक आयोजित
निलेश जोशी | कुडाळ : तेंडोली-खरावतेवाडी येथील दादा गावडे यांच्या घरा नजीक १० जून रोजी
सायंकाळी ७ वाजता जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे 'राजा रुक्मांगत' हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे.
या नाटकातील कलाकार- गणपती-विनायक सर्वेकर, रिद्धी-सिद्धी- चैतन्य गावडे ,
राजा रुक्मांगत-संजय वालावलकर,
कलीदेव-महेश गवंडे, यमधर्म-सतीश बागवे, देवदूत / विष्णू-गिरीश राऊळ,
देवदूत /राणी-सिद्धेश मुणनकर,
मडवळ-मंगेश साटम, मडवळीन-विनायक सर्वेकर,इंद्र-विलास तेंडोलकर,नारद-बाळू कोचरेकर,माळी-बाबा कामत, सुंदरी-दीप निर्गुण कलाकार आहेत. तर संगीत साथ-हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, पखवाज-दादा आकेरकर,झांज- प्रथमेश गावडे यांची आहे.

