Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांना पुन्हा एकदा यश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांना पुन्हा एकदा यश

न्यायालयाने दिले महत्वपूर्ण आदेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंशाची अवैधपणे बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात अग्रेसर असलेले बजरंग दल सावंतवाडी यांनी दानोली चेकपोस्ट वर दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी पकडलेल्या MH 07AJ3575 या कुडाळ येथील बोलेरो पीक अप गाडीमध्ये जप्त केलेल्या गोवंशाच्या खावटीचा दर दिवशी 200 रुपये असा एकूण 60000 रुपये एवढा खावटीचा खर्च भरण्याचे माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी सावंतवाडी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दानोली येथे पकडण्यात आली होती. या गाडीतून जप्त करण्यात आलेले देशी गोवंश गोवा राज्यातील गोमंत गोसेवा महासंघ यांच्या गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी जप्त करण्यात आलेली बोलेरो गाडी MH07AJ 3575 मालक हुरबानो इब्राहीम खतीब याच्या गाडीमधून जप्त करण्यात आलेले बैल आपल्याला परत मिळावे असा अर्ज इब्राहिम रियाज शेख च्या वतीने माननीय सावंतवाडी न्यायालयात करण्यात आला होता. यावर माननीय सावंतवाडी न्यायालयात गोरक्षण संस्था ध्यान फाउंडेशन च्या वतीने वकील श्री.राजू गुप्ता वकील श्री.पलाश चव्हाण (मालवण) वकील श्री राहुल मडगावकर, मानद पशु कल्याण अधिकारी श्री सचिन झुंझारराव यांनी माननीय सावंतवाडी न्यायालयात आपले युक्तिवाद मांडले.. आरोपी यांचे वकील आणि गोरक्षण कार्यकर्ते यांचे वकील या दोघांचेही युक्तिवाद झाल्यानंतर माननीय सावंतवाडी न्यायालयाने अर्जदार इब्राहिम रियाज शेख तब्बल 60000 हजार रुपये एवढा खावटी खर्च जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजरंग दल कार्यकर्ते गोरक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे . ही कारवाई बजरंग दलाचे गोरक्षा विभाग प्रमुख श्री दिनेश गावडे, बजरंग दल संयोजक श्रीकृष्ण धुळपनावर, श्री साईराज नार्वेकर,श्री लाडू रायका, श्री रोहन धुरी,श्री हितेन नाईक, श्री प्रथमेश गावडे , श्री अथर्व केसरकर, कौशिक केसरकर यांनी जानेवारी महिन्याच्या तीन तारीख रोजी केली होती.

माननीय न्यायालय सावंतवाडी यांनी सुद्धा या पूर्वी अशाच प्रकरणा मध्ये खावटी खर्च भरण्याचे आदेश दिले होते. अशी माहिती ऍड. पलाश चव्हाण यांनी दिली माहिती.

rapan bottom