Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

सावध राहा ; चोरटे करताहेत बंद घरे टार्गेट !

सावध राहा ; चोरटे करताहेत बंद घरे टार्गेट !

घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलीसांचे नागरीकांना आवाहन

निलेश जोशी | कुडाळ : सध्या कुडाळ शहरात घरफोडी, चोरीचे प्रमाणात वाढ झालेली आहे. चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. नागरीकांचे मालमत्तेचे रक्षण करणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य आहेच परंतु नागरीकांचे जागरूकतेमुळे व मदतीमुळे चोरी घर फोडीच्या गुन्हयांना आळा घालता येईल, चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणता येतील. नागरीकांचे मालमत्तेचे रक्षण व्हावे याकरीता कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नागरीकांना सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जे नागरीक आपले घर बंद करुन बाहेर गांवी जाणार आहेत त्यांनी घरात सोन्या, चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तु अगर रोख रक्कम ठेवुन जावु नये. बाहेरगांवी जाणारे नागरींकनी आपले मौल्यवान वस्तु शक्यतो बँकेच्या लॉकर्स मध्ये सुरक्षीत ठेवावेत. जर आपण बाहेर गांवी जाणार असल्यास त्याबाबतची माहीती आपले शेजाऱ्यांना व पोलीसांना दयावी. काही घरांचा मुख्य दरवाजा हा मजबुत असतो परंतु दरवाजाचा कडी कोयंडा हा घराच्या मुख्य दरवाजांना मजबुत असे कुलुप लावावे. शक्य असल्यास अलार्म करणाऱ्या कुलुपांचा वापर करावा.
आपले परीसरात कोणी संशयीत अनोळखी इसम फिरत असल्यास त्याची माहीती तात्काळ पोलीस ठाण्यात दयावी. आपले घरात किंवा सोसायटी मध्ये कोणी परप्रांतीय इसम भाडयाने राहत असल्यास त्याची सविस्तर माहीती पोलीस ठाण्यास दयावी. शक्य असल्यास आपण राहत असलेल्या परीसरात CCTV कॅमेरे बसवावेत. आपण बाहेर गांवी गेल्यानंतर त्याबाबतचे फोटो तात्काळ फेसबुक, वॉटसअॅप, इंन्टाग्राम अकाऊंट या सारख्या सामाजिक माध्यमावर प्रसारीत करु नयेत. घराचे मुख्य दरवाजाचे बाहेर दुसरा लोखंडी दरवाजा बसवावा. . घराच्या खिडक्यांना मजबुत लोखंडी ग्रील बसवावेत.
काही घरांचा मुख्य दरवाजा मजबुत असतो परंतु मागील दरवाजा हा बऱ्याच वेळा सिमेन्टचा किंवा प्लायवुडचा बसवितात. त्यामुळे चोरटे हे मागील दरवाजा उचकटुन घरात प्रवेश करतात. त्यामुळे मागील दरवाजा हा देखील मजबुत बसवावा. भविष्यात चोरी घर फोडी सारखे गुन्हे घडल्यास घटनास्थळी कोणत्याही वस्तु हाताळू नयेत. तात्काळ पोलीसांना संपर्क साधावा. असे आवाहन कुडाळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.

rapan bottom