Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

देशभरात 'शिवराज भूषण' महानाट्य यशस्वी ठरेल!

देशभरात 'शिवराज भूषण' महानाट्य यशस्वी ठरेल!

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित मालवणात शुभारंभ : महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मिती असलेल्या आणि मालवण सिंधुदुर्गमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या 'शिवराज भूषण' या ऐतिहासिक महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मालवण येथील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला. या नाट्यप्रयोगाला नाट्य रसिकांनी मोठी गर्दी केली. उत्स्फूर्त प्रतिसादात महानाट्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

देशभरात 'शिवराज भूषण' महानाट्य यशस्वी ठरेल. महानाट्याच्या पुढील वाटचालीस आवश्यक ते सहकार्यसाठी सदैव सोबत आहे. अश्या भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. शिवभक्त व नाट्यप्रेमी यांच्यासोबत आमदार निलेश राणे यांनी शुभारंभाचा प्रयोग पाहिला. महानाट्यातील सर्वांच्या अभिनयाचे कौतुक करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवराज मंच, मालवण निर्मित 'शिवराज भूषण' या ऐतिहासिक महानाट्याचे शुभारंभाचे दोन प्रयोग ६ व ७ जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे आयोजित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या महानाट्याचा भव्य शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी शिवशंभु मंचचे महाराष्ट्र प्रांत संयोजक सुधीर थोरात, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, रुपेश मोरे, शिवव्याख्याते पंकज भोसले, किल्ले विजयदुर्ग समितीचे अध्यक्ष राजीव परुळेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा कार्यवाह लवू महाडेश्वर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, निर्माते भूषण साटम, नाटकाचे लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, समीर शिंदे, संजय शिंदे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांसह अनेक शिवभक्त, नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे, सुधीर थोरात यांच्यासह पंकज भोसले, लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, शिवप्रेमी सौ. शिल्पा खोत, हेमंत कोळंबकर यांचा सत्कार करण्यात आला. तर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीने निर्माते भूषण साटम यांचा विशेष सन्मानित करण्यात आले.

यावेळी भूषण साटम यांनी नाटकाविषयी माहिती देताना कवी भूषण यांचे शिवराज भूषण हे काव्य महाराष्ट्रात काहीसे दुर्लक्षित राहिले, हे काव्य व त्यात मांडलेला शिवरायांचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे सांगितले.

यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, मालवणातील कलाकारांनी एकत्र येऊन केलेले महानाट्य कौतुकास्पद आहे. शिवरायांच्या इतिहासातील दस्तऐवज अनेक गोष्टी आहेत, ज्यावर संशोधन व्हायचे बाकी आहे, केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर अनेक राज्यातील शिवरायांचा इतिहास आहे, इतिहासातील अनेक दस्तऐवज अजूनही बाकी आहेत. हा इतिहास व दस्तऐवज समोर आणण्यासाठी आपण सांस्कृतिक विभागाशी पत्र व्यवहार करत आहोत, असेही आम. राणे म्हणाले.

यावेळी सुधीर थोरात म्हणाले, भारतात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू संस्कृतीचे रक्षण झाले. शिवकाळातील समकालीन कवी भूषण यांनी लिहून ठेवलेला इतिहास महानाट्याच्या रूपाने समोर येतोय, त्यासाठी सर्व कलाकारांचे कौतुक आहे, असेही थोरात म्हणाले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

शुभारंभाच्या नाट्यप्रयोगाला नाट्यप्रेमी शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वांनीच नाट्य कलाकृती व कलावंत यांचे विशेष कौतुक केले.

शिवराज भूषण' या ऐतिहासिक महानाट्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

शिवराज भूषण' या ऐतिहासिक महानाट्यातील सर्व कलावंत.

rapan bottom