Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

कुडाळ-नाबरवाडीत घरफोडी

कुडाळ-नाबरवाडीत घरफोडी

२ लाखाहुन जास्त रकमेचा ऐवज चोरीस

अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ नाबरवाडी येथील रहिवाशी विनोद रुद्रे यांच्या घरात झालेल्या चोरीमध्ये तब्बल रोख रक्कम १ लाख ८० हजारसह ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १ हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलिसातून देण्यात आली.
नाबरवाडी येथील विनोद रुद्रे हे आपल्या मुलाजवळ मंगळवार ३ जून रोजी मुंबई येथे गेले होते. त्यांच्या घराच्या सभोवताली सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. दरम्यान ते मुंबईमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. हे सीसीटीव्ही का बंद आहेत? याची चौकशी करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला त्यांच्या बंद असलेल्या घरी पाठविले. त्यांच्या भावाने बघितले तर घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील असलेली कपाटे फोडलेली आहेत. तसेच सामान अस्ताव्यस्त टाकलेले आहे. ही माहिती विनोद रुद्रे यांना दिल्यानंतर ते तात्काळ कुडाळ मध्ये आले त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेली घटना सांगितली.मुंबईवरून विनोद रुद्रे आल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली यामध्ये त्यांनी सांगितले की घरातील कपाटांमधील रोख रक्कम १ लाख ८० हजार, ४० हजार रुपये किमतीची एक सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सीसीटीव्हीसाठी लागणारा १ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर मशीन चोरीला गेला आहेत. त्यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही चोरी झाल्यानंतर ठसे तज्ञ तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. हे श्वान पथक घरापासून ४०० मीटर अंतरावर नेरूर रस्त्याला जाऊन घुटमळले. त्यामुळे पुढचा मार्ग पोलिसांना सापडू शकला नाही. घटनास्थळी पोलीस उपधिक्षक आढाव तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, तपासी पोलीस अधिकारी भांड दयानंद चव्हाण यांनी भेट दिली.

rapan bottom