Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

जनतेला अपेक्षित विकासकामे १०० टक्के पुर्ण करणार : आमदार निलेश राणे

जनतेला अपेक्षित विकासकामे १०० टक्के पुर्ण करणार : आमदार निलेश राणे

गड नदीवरील मोठया पुलाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावरील गड नदीवर पुलाची उभारणी

मालवण | प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. मालवण कुडाळ मतदार संघाचा विचार करता मागील दहा वर्षात येथे काहीच झाले नाही. विकासाचा हा बॅकलॉग भरून काढत असताना महायुती सरकार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी मालवण कुडाळ मतदारसंघात उपलब्ध झाला. अनेक भूमिपूजन, उदघाटने होत असताना विकासाची ही गती अशीच कायम राहील. गावागावात जनतेला अपेक्षित विकासकामे 100 टक्के पुर्ण करणार. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी किर्लोस मालवण येथे बोलताना केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ कार्यकाळ पासून पंतप्रधान ग्रामसडक योजनेत निधीची वाढ झाली. अनेक कामे मोठया प्रमाणात झाली. पूर्वी काँग्रेस कार्यकाळात निधीच नव्हता. असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावरील गड नदीवर मोठ्या पुलाची उभारणी ८ कोटी २८ लाख निधीतून करण्यात आली आहे. या पुलाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले. यावेळी परिसरात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करून लोकार्पण सोहळा सुरु झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख महेश राणे, कुडाळ तालुकाप्रमुख दादा साईल, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, उद्योजक विनायक बाईत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, गोठणे सरपंच दिप्ती हाटले, युवा उद्योजक प्रितम गावडे, मकरंद राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश राणे, बाळा लाड, निलेश बाईत, विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर, प्रशांत परब, प्रवीण घाडीगावकर, अभि लाड, सुनील घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, दिलीप घाडीगावकर, दया हाटले, बाबू परब, घनश्याम चव्हाण, संतोष साटविलकर, संतोष कोदे, मंदार लुडबे यांसह उप अभियंता काळे मॅडम, निवेदक निलेश पवार यांसह पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विभागातील शिवसेना पदाधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी व उद्योजक विनायक बाईत व ग्रामस्थ यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वत्र गतिमान विकास पाहून विरोधक हतबल झाले. टिका करणे हेच काम सुरु आहे. मात्र शिवसेना गतीने पुढे जात आहे. असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

आमदार निलेश राणे यांचा विकास कार्याचा धडाका : दत्ता सामंत

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्या पाच महिन्यात शेकडो कोटी निधी आणला. बंधारे, रस्ते, पूल, नळपाणी योजना यासह मोठया प्रमाणात विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून होत आहेत. तर विधिमंडळ मध्ये आमदार निलेश राणे यांचा अभ्यासूपणा जनतेने बघितला. ही विकासाची गती अशीच कायम राहील. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांच्या कामाचे विशेष कौतुक

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांच्या कामाचे विशेष कौतुक आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांनी केले. त्यांचा तसेच ओमटेक असोसिएट यांच्या सत्कार करण्यात आला. तर पुलासाठी मोफत जागा देणारे ग्रामस्थ यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बाळा लाड राजू परुळेकर यांनी पुलाचा इतिहास व पूर्वीची स्थिती सांगितली. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकास सुरु आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनतेतून सर्व गावे जोडा

पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनतेतून सर्व गावे जोडा. कोणताही गांव विकास मार्गापासून वंचित राहता नये.
आमदार म्हणून की कमी पडणार नाही. आवश्यक असणारे सर्व सहकार्यसाठी मी सोबत आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करणे हेच आपले प्रमुख लक्ष असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.

rapan bottom