शिवराज्याभिषेक चित्राचे अनावरण.
निलेश जोशी | कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी महाविद्यालयामध्ये सर्वांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक चित्राचे अनावरण केले.
क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी सरकार्यवाह अनंत वैद्य,सहकार्यवाह महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, स.का.पाटील महाविद्यालय मालवणचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, ज्येष्ठ प्रा.अनंत लोखंडे, कॅप्टन डॉ. एस.टी. आवटे, डॉ. शरयू आसोलकर, प्रा. पी.एस. केरवडेकर तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्यासंखेने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी महाविद्यालयामध्ये सर्वांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक चित्राचे अनावरण केले. अरविंद शिरसाट, अनंत वैद्य, प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी सर्वांना ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

