Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

नेरुर येथे ८ जून रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

नेरुर येथे ८ जून रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे शिबिराचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत मोफत आयुर्वेदिक उपचारांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने घ्यावा .असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर व बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट च्या अध्यक्षा श्रीम. अदिती पै यांनी केले आहे .
या शिबिरासाठी डॉक्टर सुजाता कदम , डॉक्टर प्रशांत ससाने, डॉक्टर प्रवीण भट, डॉक्टर विनायक चकोर , डॉक्टर अंकिता मसुरकर या तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी केली जाणार आहे.
या मोफत आयुर्वेदिक महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, एलर्जी, अस्थमा, त्वचा विकार, पचनाच्या समस्या, हाडांचे व सांध्यांचे आजार, किडनी विकार, पक्षाघात, वात विकार, मलावरोध, मूळव्याध, भगंदर, बालरोग, स्त्रीरोग, अन्य जुनाट विकार, थायरॉईड, नेत्र तपासणी इत्यादी आजारांवर अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
सदर तपासणी दरम्यान विविध आजारावरील औषधे व गोळ्या मोफत दिले जाणार आहेत ;तसेच आवश्यकता भासल्यास एक्स रे व इसीजी केले जाणार आहेत.
गरजू रुग्णांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या दृष्टीने कवठी, वालावल, चेंदवण ,नेरूर, पाट, हुमरमळा, आंदुर्ले, गोवेरी, पिंगुळी या गावांमध्ये नर्सींग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां मार्फत तसेच आशाताईंच्या माध्यमातून शिबिराची माहिती देण्यात आली आहे.
तरी रुग्णांनी डॉ. सायली गावडे मोब नं 9404919021, प्रा. वैशाली ओटवणेकर 9881886606, प्रा. शंकर माधव 9284508373, प्रा. प्रथमेश हरमलकर 8010273926, अक्षया सामंत 9765925409 यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

rapan bottom