जय गणेश ईंग्लिश स्कूल येथे पर्यावरण दिन साजरा केला.
मालवण : आज पर्यावरण दिनानिमित्त मालवण जय गणेश ईंग्लिश स्कूल येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. शिवसेना मुख्य नेते मा. ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच मालवण कुडाळ विधानसभेचे आमदार मा.श्री.नीलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली,शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.श्री.विश्वास गांवकर यांच्या संकल्पनेमधून आजचा हा उपक्रम मालवण जय गणेश ईंग्लिश मिडीयम मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव किसनजी मांजरेकर,शिवसेना युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षदजी पारकर,शिवसैनिक जयंत ठोंबरे तसेच जय गणेश शिक्षक निशिकांत पराडकर सर,विशेष तज्ञ विलास रुपवर सर,ममता जोगल मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

