नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले बेंचेस
मालवण : कार्यसम्राट नेतृत्व मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. एकूण ७ बेंचेस चे या निमित्ताने वितरण करण्यात आले.
चिवला बीच चौकचार मंडळ या ठिकाणी २, महापुरुष मित्रमंडळ रेवताळे २, बाबू वायंगणकर मित्रमंडळ १, आणि आदर्श नगर मित्रमंडळ रेवताळे येथे २ अश्या स्वरूपात बेंचेस बसविण्यात आले. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दीपक पाटकर यांच्या या सामाजिक आदर्शवत उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक भावानेतून सेवाकार्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.


