Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

मालवणातील अग्निशमन केंद्र इमारतीचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच

मालवणातील अग्निशमन केंद्र इमारतीचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र इमारतीचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच आहे. आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळेच हे काम पूर्णत्वाकडे गेले. अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.

अतिशय धीम्या गतीने चाललेले काम निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे पूर्णत्वाकडे गेले. अन्य बाबी प्रमाणे जनतेच्या जीविताशी निगडित संवेदनशील विषयातही प्रशासक सुशेगात असताना मालवण नगर परिषदेला अग्नी सुरक्षा बळकटीकरण अंतर्गत अग्निशमन इमारत बांधण्यासाठी आमच्या नगराध्यक्ष कालावधीपूर्वी अल्प निधी प्राप्त झाला होता. निधी कमी असल्याने आणि अन्य काही अडचणीमुळे त्यावेळी हे काम होऊ शकले नाही. आमच्या कालावधीत 2018 मध्ये पुन्ह या कामासाठी पाठपुरावा करून 2019 मध्ये निधी मंजूर करून घेण्यात आला. 2020 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती. हे काम मुदतीत पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदारना संपूर्ण सहकार्याची भूमिका आमच्या कालावधीत घेण्यात आली होती. कारण अश्या प्रकारचे अद्ययावत अग्निशमन केंद्र सिंधुदुर्गात प्रथमतः आमच्या मालवण मध्ये होणार होत.
मालवण शहर हे सध्या पर्यटन शहर म्हणून नावारूपाला येत आहे. पर्यटकाना चांगल्या सुविधा देण्यासाठी नागरिक आर्थिक गुंतवणूक करून आपल्या परीने प्रयन्त करीत आहे. हॉटेल, वॉटरस्पोर्ट्स यासाठी लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. विकासक वाणिज्य, निवासी अश्या बहुमजली इमारती बांधत आहेत. त्यामूळे पर्यटक, मालवण शहरांचे नागरिक यांच्या जिविताचे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुविधा पुरविणे या एकमेव हेतूने अग्निशमन केंद्राच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु आमचा लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ 2021 ला संपल्यावर या कामाची गती मंदावली होती . याबाबत सातत्याने सूचना करूनही या कामाकडे गांभीर्याने बघितले गेले नाही. पण ज्या वेळी कुडाळ मालवण चे आमदार म्हणून निलेश राणे यांनी कार्यभार हाती घेतल्या नंतर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या मुळे खऱ्याअर्थानं या कामाला गती प्राप्त झाली. आणि पुढच्या सहा महिन्यातच हे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. त्यामुळे याकामाचे श्रेय हे आमदार निलेश राणे यांचेच आहे.

अग्निशमन हा शहराच्या दृष्टीने संवेदनशील विषय असताना, निधीची उपलब्धता असताना प्रशासक आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे या कामाला पाच वर्षाचा कालावधी लागला आहे. नुकत्याच देवगड येथील कामाचा आढावा घेताना पालकमंत्री नितेश राणे यांनी निधी देऊनही ठेकेदार मुदतीत काम करीत नसतील तर त्यांच्या वर दंडात्मक कारवाई करा, त्यांना काळया यादीत टाका अश्या सक्त सूचना केल्या आहेत. मालवण नगरपरिषदेच्या या कामा बाबतही जे कोणी दोषी असतील त्यांच्या वर अशी सक्त कारवाई करण्याबाबत आमचे आमदार शहानिशा करून अलहिदा निर्णय घेतील यात शंका नाही. कारण आमदार निलेशजी राणे यांनी देशाच्या सर्वोच्च अश्या संसदेत खासदार म्हणून काम केल्या नंतर फक्त मालवण कुडाळ मतदार संघाच्या विकास हे व्हिजन घेवून आमदार म्हणून निवडणुक लढवलेली आहे. आणि त्यांना त्यांचा स्वप्नवत असा मतदार संघ बनविण्यासाठी ते नक्कीच प्रयत्नशिल आहेत. फक्त आता या अग्निशमन केंद्रासाठी मालवण नगर पालिकेच्या स्टाफ पॅटर्नमध्ये स्टाफ मंजूर आहे. तो स्टाफ भरण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही होताच हे अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरु होईल. कारण सध्या अद्यावत अशी अग्निशमन गाडी मालवण नगरपरिषदे उपलब्ध आहे. आता पर्यंत आगीसारख्या घटना घडल्यावर नगरपरिषदेच्या उपलब्ध कर्मचारी यांच्या कडून काम करून घेतले जात आहे जे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे अग्निशमन कामात प्रशिक्षित अशी शासन स्तरावरील पदे भरतीचे काम आमचे आमदार प्राधान्याने करतील यात शंका नाही. असेही महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रातून स्पष्ट केले.

rapan bottom