व्हरायटी मिळणार एकाच छताखाली
मालवण : मालवण शहरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले सुप्रिया पेंडुरकर यांचे AURA - Wear Your Confidence या महिलांच्या गारमेंट शॉपच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ आज बुधवार ४ जून रोजी संपन्न झाला. मालवण शहर भरड येथील रामेश्वर कॉम्प्लेक्स समोर, येथे हे नवे दालन सुरू करण्यात आले आहे.

या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन सौ. अर्चना अरविंद वेर्लेकर व अरविंद रघुवीर वेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी "AURA" च्या सर्वेसर्वा सौ. सुप्रिया पेंडुरकर, संजय पेंडुरकर, सलोनी पेंडुरकर, कनक पेंडुरकर, शांती पाटील, ममता लुडबे, जगदीश कीर, हर्ष बिडये, यशश्री पवार, निकिता ताम्हाणेकर व हितचिंतक उपस्थित होते.

आमच्या "AURA" गारमेंट शॉप मधून महिलांना निश्चितच विविध व्हरायटी मिळेल. सर्वांनी आमच्या नवीन दालनाला भेट द्या. तुमच्या सदिच्छा या आमच्यासाठी बहुमोल आहेत. अश्या भावना AURA - Wear Your Confidence शॉप च्या सर्वेसर्वा सुप्रिया पेंडुरकर यांनी व्यक्त केल्या आहेत.


