Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

फ्लाय९१ची २० मार्गांवर तिकिटांवर मॉन्सून ऑफर

फ्लाय९१ची २० मार्गांवर तिकिटांवर मॉन्सून ऑफर

सिंधुदुर्ग ते पुणे, हैद्राबाद, बंगळुरू मार्गावरही मिळणार सवलत

निलेश जोशी | सिंधुदुर्ग : गोवास्थित ‘फ्लाय९१’ या प्रादेशिक विमान कंपनीने पावसाळ्यानिमित्त प्रवाशांसाठी एक विशेष मॉन्सून ऑफर सवलत योजना जाहीर केली आहे. या अन्यर्गत कंपनीच्या २० मार्गांवर  ₹३०० पर्यंत सवलत देण्यात येणार आहे. यामध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्गही समाविष्ट आहेत. सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळावरून पुणे, हैद्राबाद आणि बंगळुरू या मार्गासाठीसुद्धा ही सवलत लागू आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मधील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
     ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल, आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल.
    गोवा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच गोव्यातील पर्यटन आणि प्रवासी व्यवसायाशी संबंधित घटकांसोबत घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ या विमान कंपनीने खास सवलतीची योजना जाहीर केली आहे.
     ही सवलत गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगा (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांवर लागू होईल. याशिवाय पुणे–सिंधुदुर्ग, बेंगळुरू–सिंधुदुर्ग, हैदराबाद–सिंधुदुर्ग, जळगाव–हैदराबाद, जळगाव–पुणे आणि गोवा–सोलापूर या मार्गांवर देखील ही ऑफर लागू होणार आहे.
     पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे, असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.
     फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपातील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.

rapan bottom