Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका : पालकमंत्री नितेश राणे

जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका : पालकमंत्री नितेश राणे

महावितरण कार्यालयाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट

नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना


निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली. वीज पुरवठा जास्त वेळ खंडित ठेवू नका असे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचीही माहिती घेतली. कामकाजामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गाव विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिले. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशाप्रकारे काम चालू आहे, याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (शुक्रवारी) नियंत्रण कक्षाला भेट दिली. या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली. तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली.


यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे. आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका. तसेच तासान तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या, अशा सूचना दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom