Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुंभारमाठ येथील खालसा पंजाबी ढाबा मारहाण प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा आरोपींना मे. जिल्हा व सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

कुंभारमाठ येथील खालसा पंजाबी ढाबा मारहाण प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा आरोपींना मे. जिल्हा व सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

मालवण : कुंभारमाठ येथील खालसा पंजाबी ढाबा येथे जेवण न दिल्याच्या रागाने झालेल्या वादविवाद व मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले प्रथमेश रविंद्र शिरपुटे वय 26 राह. सोमवारपेठ मालवण व वैभव बाळकृष्ण मयेकर वय 33 राह. धुरीवाडा मालवण यांना ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी प्रत्येकी रक्कम रु 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

दि. 10/02/2025 रात्रौ 12 च्या सुमारास प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी, हरेश वसंत ढवळे हे इसम ढाब्यावर जेवण देण्यासाठी वादविवाद करुन जेवण देत नसल्याच्या रागातून या सर्वानी अनोळखी 3 इसमांना बोलावून सर्वानी मिळून ढाबा मालक, मॅनेजर व कामगार यांना मारहाण केली व कोल्ड्रिंकच्या काचेच्या बाटलीने डोक्यावर मारहाण करून जीवघेणा हल्ल्या केल्याची व गंभीर दुखापत केल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात दि. 11/02/2025 रोजी दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी यांना दि. 11/02/2025 रोजी अटक केली होती. हरेश वसंत ढवळे याला वैद्यकीय तपासणीमध्ये इजा आढळल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. याच दरम्याने संशयितांनी त्यांना ढाबा मालक व कामगार यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानेच वादविवाद झाल्याची परस्पर विरोधी तक्रार केल्याने ढाबा मालक व कामगार यांचेविरुद्ध देखील मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

अटक संशयितांना मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयितांना दि. 15/02/2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर दि. 15/02/2025 रोजी आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपी क्र. 3 प्रथमेश शिरपुटे याने मे. सत्र न्यायालय ओरोस येथे केलेला जामीनअर्ज तपासकाम अपूर्ण असल्याच्या व अन्य आरोपी अटक झाले नसल्याच्या कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून संशयीत न्यायालयीन कोठडीत आहेत.

त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करुन एकूण सात आरोपींविरुद्ध मे. मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर आरोपी क्र. 1 व 3 यांनी मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती दि. 28/05/2025 रोजी मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग-ओरोस यांनी आरोपींना प्रत्येकी रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.

rapan bottom