Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण क्रिकेट च्या यशस्वीतेसाठी माझे ही योगदान नेहमीच राहील

मालवण क्रिकेट च्या यशस्वीतेसाठी माझे ही योगदान नेहमीच राहील

ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगांवकर

मालवण : मालवण देवबागचे सुपुत्र,ज्येष्ठ क्रिकेटपटू व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदान समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग साळगांवकर मुळ गांव देवबाग, मालवण येथे आले होते. या दरम्यान त्यांनी मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडची पहाणी केली. बोर्डिंग मैदान माती पसरवून समपातळीत करणे, सीमारेषा ७० मीटर पर्यंत वाढविणे, सीमारेषेच्या बाहेर ५ नेट प्रॅक्टीस विकेट तयार करणे आणि विकेट, आउटफील्डला चांगल्या प्रतीचे गवत लाऊन हिरवेगार करणे या सुरू असलेल्या कामाची तसेच ते काम करीत असलेल्या ग्राऊंडसमन यांची त्यांनी प्रशंसा केली. तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून काम अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शक सूचनाही केल्या.

पांडुरंग साळगांवकर म्हणाले, जर पांडुरंग साळगांवकर सारखा खेळाडू मालवणमधून तयार झाला म्हणजे मालवणच्या मातीमध्ये फास्ट बाॅलर बनवण्याची कुवत आहे. त्यांच्यानंतर दर्शन बांदेकरने सुद्धा प्रयत्न केला पण त्यालासुद्धा पुढे जेवढे यश मिळायला पाहिजे तेव्हढे यश मिळालं नाही, याचे कारण शेवटी फास्ट बाॅलरला फार सातत्याने चिकाटीने,जिद्दीने सराव करावा लागतो. प्रत्येकाला संयम पाळावा लागतो,थांबावं लागत आणि जर दर्शन बांदेकर त्यावेळी मुंबई संघाकडून खेळण्यासाठी न जाता महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी थांबला असता तर नक्कीच तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून रणजी ट्रॉफीला किंवा त्याही वरच्या दर्जाचे क्रिकेट तो अवश्य खेळला असता.

गेली दोन वर्षे मालवण बोर्डिंग ग्राऊंडवर, मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने श्रीमती.मिथिला बांदिवडेकर यांच्या तर्फे प्रायोजित व सहकार्याने मालवण तालुक्यातील शालेय मुलांसाठी बीसीसीआय मान्यताप्राप्त पंच तसेच त्यांचे वडिल कै.विलास बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ कै.विलास बांदिवडेकर स्मृतीचषक सारख्या लेदरबाॅल क्रिकेटच्या शालेय स्पर्धेची तसेच त्या स्पर्धेत मालवण तालुक्यातील २२ प्राथमिक शाळांचे संघ सहभागी होतात याची त्यांनी विशेष प्रशंसा केली. ते म्हणाले की,शालेय स्तरावर क्रिकेट स्पर्धा व्हायला पाहिजे.याच कारण अस आहे की आम्ही बघतो ज्यावेळी क्लबला लेव्हलला एखादा खेळाडू खेळतो,मुलगा खेळतो तो त्या क्लबचे एक शंभर, दोनशे लोकांपर्यंत त्याच लिडींग करत असतो. पण एखादा मुलगा एखाद्या शाळेत,एखाद्या शाळेची पटसंख्या जर हजार,दीड हजार,दोन हजार असेल तर तो त्या शाळेचे प्रतिनिधित्व करत असतो आणि एखादा मुलगा त्या शाळेला प्रतिनिधित्व करताना त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर त्या मुख्याधपकाची ज्यावेळी थाप पडते तर त्याच्यासाठी त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षणच नसतो. आता तुम्ही बघा की,शारदाश्रम,अंजुमन इस्लाम,बालमोहन ह्या ज्या मुंबईमधील शाळा आहेत त्याच्यामध्ये मुलं त्याच शाळेच प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळून त्यांच्या मध्ये अजूनही पुढे जाण्याची, जिंकण्याची सारखी ओढ लागलेली असते. ही ओढ मालवणसारख्या तालुक्यामधील खेळाडूंमध्ये निर्माण व्हायला पाहिजे.मुंबईत ज्याप्रमाणे गाईल्स शिल्ड, हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट स्पर्धा दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत,त्याचप्रमाणे मालवण तालुका स्तरावर आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉलेजच्या तसेच मालवण तालुक्यातील शाळांच्या एक दिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात आणि यासाठी त्यांना क्रिकेट विषयक आवश्यक सुविधा म्हणजे मैदान,क्रिकेट साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे आणि यासाठी विशेष प्रयत्न व्हायला पाहिजेत.जिल्हा क्रीडा अधिकारी,जिल्हाधिकारी यांनी त्यासाठी दरवर्षी जिल्ह्याच्या बजेट मध्ये त्यासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मालवण तालुक्यातल्या शाळांनी,शिक्षकांनी आणि खेळाडूंच्या पालकांनी जर मनावर घेतले तर मालवण तालुक्यातील खेळाडू हे नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या,महाराष्ट्राच्या संघात दिसतील आणि मालवणच्या मातीला,जमिनीला त्याची सवय आहे आणि तसे झाले तरच जयंत गवंडे सारखी व्यक्ती जी मागील २० वर्षापासून निस्वार्थीपणे पदरमोड करून, स्वतःचा वेळ देऊन मालवण,सिंधुदुर्ग क्रिकेटच्या विकासासाठी,खेळाडूंसाठी,बोर्डिंग मैदानासाठी त्याग भावनेने काम करीत आहे,योगदान देत आहे,त्याच्या कामाचे,श्रमाचे चीज होऊन ते सार्थकी लागतील.

यावर्षी मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनने दिनेश व्यास चॅरिटेबल ट्रस्ट,मुंबई यांच्या सहकार्याने राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमाणित प्रशिक्षक श्री.आशिष परुळेकर यांचे मालवण तालुक्यातील शालेय खेळाडूंसाठी विनामूल्य लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते आणि या प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे माजी कसोटीपटू प्रसिद्ध फलंदाज श्री.संजयजी मांजरेकर हे उपस्थित होते.आदरणीय श्री.संजयजी मांजरेकर सारखे भारताचे महान खेळाडू मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर क्रिकेट प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने क्रिकेट विकासा संदर्भात उपक्रमास भेट दिली,याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.त्यांनी पुढे असेही सुचविले की कै.विलास बांदिवडेकर शालेय लेदर बॉल स्मृतीचषक स्पर्धा ही यावर्षी ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येऊन त्यावेळी प्रशिक्षक श्री.आशिष परुळेकर यांना मालवणमध्ये आमंत्रित करून त्या स्पर्धेतील खेळाडूंमधून त्यांना उत्कृष्ट क्रिकेटपटूंची निवड करण्यास सांगून त्यानंतर प्रशिक्षक श्री.आशिष परुळेकर यांनी निवडलेल्या खेळाडूंना आशिष परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर नियमितपणे,सातत्याने लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण देण्यात यावे.

ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगांवकर या वर्षी मालवणच्या बोर्डिंग मैदानावर बीसीसीआयचा सामना आयोजित करण्याविषयी म्हणाले की, मालवणला सामने अवश्य मिळू शकतील.यापूर्वी बीसीसीआयचे चार सामने यशस्वीपणे आयोजित करण्याचा त्यांना अनुभव आहे.प्रत्येक स्टेजला कोण ना कोण तरी पुश करणारा असतो. माझा नेहमी मालवणच्या क्रिकेटसाठी प्रयत्न चालू असतो,पण काय असत मी कधी स्टेजवर येत नाही.माझी नेहमीच पडद्यामागून काम करण्याची सवय आहे.त्याला काय एक असत की ते काम होईलच किंवा नाही होईल अस काही नसत,पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे आणि ते कराव आणि मी अजूनही होपफुल आहे.
मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने यापूर्वी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र,जम्मू काश्मीर,झारखंड,ओरिसा असे सी. के.नायडू स्पर्धेचे ४ सामने यशस्वीपणे आयोजीत केले आहेत.ते सर्व सामने निर्धारित तीनही दिवस चालले आणि महाराष्ट्र संघाने ते चारही सामने निर्विवाद जिंकले होते.त्यावेळी ते चारही बीसीसीआयचे सामने आयोजित करताना मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनकडे ड्रेसिंग रूम,इंजिन रोलर,बाऊंड्री रोप,विकेट कव्हर,नेट प्रॅक्टीस विकेट या सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा त्यांनी यशस्वी आयोजन केले होते आता तर मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन वरील सर्व क्रीडा साहित्य आहे आणि मालवण येथील बोर्डिंग मैदान चांगल्या प्रकारे तयार केले आहे तसेच ते सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि सुसज्ज आहे.त्यामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे मालवण येथील बोर्डिंग मैदानावर बीसीसीआयचा सामना आयोजित करण्याची मागणी नक्कीच करायला पाहिजे.मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनने तालुका क्रिकेट असोसिएशने कसे काम करावे त्याप्रमाणे उत्तम,दखलपात्र काम केले असून त्यांनी आपल्या कामामुळे महाराष्ट्रातील सर्व तालुका क्रिकेट असोसिएशन समोर चांगला आदर्श ठेवला आहे,या शब्दात त्यांनी मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या कामाची स्तुती केली.

rapan bottom