कट्टा : दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या वराड कावळेवाडी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य वराड कावळेवाडी येथील ग्रामविकास मंडळ यांच्यावतीने करण्यात आले. ग्रामविकास मंडळ कावळेवाडीचे अध्यक्ष देवेन (पप्पू) ढोलम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, विद्यार्थी , पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्ष देवेन ढोलम बोलताना म्हणाले की विद्यार्थी हे पुढचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांनी मिळवलेले यश याबाबत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे आपले कर्तव्य आहे. ग्रामविकास मंडळातर्फे यापुढेही विद्यार्थ्यांसाठी असेच उपक्रम राबविले जातील. व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार अनिल फणसेकर, सुरेश भरडे, प्रकाश लुडबे, संजय पोखरणकर, श्रीमती अनुसया चव्हाण, परमानंद वेंगुर्लेकर, सुनील पोखरणकर, बाळा रावले, नितीन लुडबे, पुरुषोत्तम खडपे, महादेव मलये, प्रभाकर पोखरणकर, अनघा फणसेकर, अमर लुडबे, योगेश वेंगुर्लेकर, नितीन शेट्ये, अवधूत चव्हाण, देवेंद्र म्हाडगुत, प्रकाश गावडे, प्रेम परब, रोहन चव्हाण, नितेश खडपे व अन्य मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले.

