Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी घेतलेला पुढाकार बळ देईल

गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी घेतलेला पुढाकार बळ देईल

सिंधुदुर्ग गाबित समाज जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण : महाराष्ट्र सरकारने सतरा प्रकारच्या वेगवेगळ्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामध्ये हिंदू धर्मातील विविध समाजाचा समावेश आहे. तसेच यापूर्वी महात्मा फुले महामंडळ अण्णासाहेब पाटील, महामंडळ शामराव पेजे महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ ,चर्मोद्योग महामंडळ, ही महामंडळ आहेत. नाभिक समाजासाठी संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ पण स्थापन करण्यात आलेले आहे.

हिंदू धर्मातील क्षत्रिय आरमारी म्हणून ओळखला जाणारा गाबीत समाज हा विशेषतः महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वसलेला आहे. तसेच या समाजाला सन ६५९ पासूनचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या आरमाराच्या बांधणीत आणि स्वराज्याच्या लढाईत गाबीत समाजाचा मोठा वाटा आहे. पुढील काळात गाबीत समाज मासेमारीकडे वळला .तसेच सद्यस्थितीत मासेमारी बरोबरच पर्यटन व्यवसायामध्ये भविष्य शोधीत आहे. गाबीत समाजाची वस्ती भारतातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र व काही प्रमाणात गुजरात येथे आढळून येते मासेमारी व्यतिरिक्त इतरही उद्योगधंद्यात गाबीत समाज संघर्ष करीत आहे.गाबीत समाज ओबीसी चा एक घटक असून तो विशेष मागास प्रवर्गात मोडतो .सरकारने मत्स्योद्योग विकास महामंडळे स्थापन केलेली आहे .परंतु सर्वंकष हिंदू गाबीत समाजाच्या विकासासाठी विशेष असे गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गरजेचे आहे. यासाठी आम्ही सरकारकडे इतर जाती जमातींच्या आर्थिक विकास महामंडळाबरोबरच, हिंदू गाबीत समाजाचे गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे. असे आवाहन सरकार कडे केले होते, तसेच गाबित समाजातील विविध संघटना याचा पाठपुरावा करीत आहेत.

सदरच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत मत्स्यद्योग मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी प्रतिसाद देत बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे सदरचा विषय मांडला व त्यांनी पण महामंडळ स्थापनेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. महामंडळ स्थापनेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे गाबीत समाजातर्फे आभार मानून लवकरच सदरचे महामंडळ स्थापन होईल असा आशावाद सिंधुदुर्ग गाबीत समाज, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला

rapan bottom