Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी गोळवण गावठाणवाडी येथील रवळनाथ मंदिरामागील जंगल भागात केलेल्या छाप्यावेळी विनापरवाना ठासणीची बंदूक बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 (1) (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील संशयित आरोपी शरद नारायण मांजरेकर वय 35 वर्षे राह. गोळवण ता. मालवण याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. के. फकीह साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.

दिनांक 22 मार्च 2019 रोजी सिंधुदुर्गनगरी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेस प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलिसांनी गोळवण येथे छापा घातला होता. त्यावेळी शरद नारायण मांजरेकर हा रवळनाथ मंदिराच्या मागील जंगल भागातून ठासणीची बंदूक घेऊन जात असताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन परवान्याची विचारणा केली असता तसा परवाना नसल्याचे संशयिताने सांगितल्यामुळे शस्त्र जप्ती करुन पोलिसांनी मालवण पोलिस ठाण्यात दि. 22 मार्च 2019 रोजी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 (1) (अ) अन्वये विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगल्याबद्दल संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासचाम करून व मे. जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांची परवानगी प्राप्त करुन आरोपीविरुद्ध मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोप दाखल केलेले होते.
सुनावणीदरम्याने सरकारपक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीअंती फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे केलेला बचावाचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपीची खटल्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

rapan bottom