Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भुरटा चोर सीसीटीव्हीत कैद

भुरटा चोर सीसीटीव्हीत कैद

दिवसाढवळ्या चोराचे धाडस : लॉकर उघडला

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाच सहा दिवसा पूर्वी ही घटना घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मात्र दुकानदाराने याबाबत पोलीसात तक्रर दिली नव्हती. मात्र पोलीसांनी यांची दखल घेत पोलीस डायरीत नोद घेतली आहे. सदर व्यक्ती भुरटा चोर असल्याची चर्चा आहे. कुडाळ तालुक्यातीलच तो रहीवाशी असल्याचे बोलले जात आहे. त्याचा चोरी करतानाच व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

दुकानाच्या काऊंटरवर व दुकानात कोणी नाही हे पाहून चोरटा भर दिवसा दुकानात शिरला. त्यानंतर दुकानात कोणी येत नाही याची खात्री करीत दुकानाच्या काऊंटरवरील टेबलचा ड्राव्हर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला लॉक असल्याने, त्याने लगतचा ड्रावर उघडून चावी शोधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याला चावी सापडली. त्यानंतर पुन्हा कोणी येत नाही, याची खात्री केली याच दरम्यान बाहेर कोणीतरी आल्याने त्याने चावी तिथेच बाजूला ठेवली. त्या नंतर तो त्यांच्याशी बोललाही, असे दिसून येत आहे. मात्र बाहेर आलेली व्यक्ती बाजूला गेल्यावर त्याने चावी घेत पैसे असलेला ड्रावर उघडला. वाकून आतील काही रक्कम काढली. कुलूप केले व त्यानंतर ती चावी त्याच जागी ठेवत काढलेले पैसे खिशात घालून निघून गेल्याचे सीसी टीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान त्या चोराच्या डोक्यावर बँडेज बांधल्याचेही दिसत असून कपाळावर जखम झाल्याचे दिसत आहे.

rapan bottom