बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या बाजूला गटार खोदाई : साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा मार्ग झाला मोकळा
चौके : ऐन मे महिन्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. कामे अपूर्ण राहिली. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून येत आहे. चौके कुडाळ रस्त्याबाजूला बाजारपेठ नजिक गटार खोदाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावर चिखल पाण्यामुळे वाहतूकदारांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत चौके ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाला निवेदन दिले होते तसेच चौके सरपंच श्री. पी. के. चौकेकर यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गटार खोदाई करुन घेतली आहे.


