मालवण | प्रतिनिधी : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी तपासण्याच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात रंगीत तालीम काळसे बागवाडी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली.


यावेळी विविध विभागाचे अधिकारी, आपतकालीन यंत्रणा, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. काळसे बागवाडी याभागात पूर स्थितीत अनेक घरांना पाण्याचा वेढा असतो. सध्या स्थितीत मे महिना असला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचे रंगीत तालीम निमित्ताने तपासण्यात आले.
अतिवृष्टीमुळे पेंडूर तलावाची पाणीपातळी वाढली आहे. याठिकाणी भेट देऊन तहसीलदार यांनी पाहाणी केली.






