मंत्री नितेश राणे यांच्या मागणी नुसार आयोजित बैठक : आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : मंत्रालयात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणी नुसार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक बैठक पार पडली.
मंत्री अतुलजी सावे यांनी लवकरच महामंडळ स्थापन होईल असे आश्वासन दिले.
कुडाळ-मालवण मतदारसंघ आमदार, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

