वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यादृष्टीने विविध विषय मांडले
मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट आमदार निलेश राणे यांनी घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी वन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे यावर भर देण्यात आला.

