Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये सिंधुदुर्गातील ९ रस्ते मंजूर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये सिंधुदुर्गातील ९ रस्ते मंजूर

२८ कोटी ७३ लाख निधी

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत रस्ते मंजुरी

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यात सातत्याने यशस्वी ठरत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक घेऊन या कामांना मंजुरी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या नव्याने मंजूर केलेला नऊ रस्त्यांच्या कामांसाठी 28 कोटी 73 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या नऊ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळालेली असल्याने  ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.तर त्या ठिकाणी जनतेची गैरसोय दूर होणार आहे. रस्त्याच्या कामांची मंजूरी मंत्रालयस्तरावर होत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने १३ मे २०२५ रोजी ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांच्या सोबत बैठकीत झाली. यावेळी प्रस्तावित कामातील असलेल्या अडचणी दूर करून या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

मंजूर रस्ते

कणकवली - तरंदळे ते सावडाव रस्ता, मालवण - गुरामवाडी मोगरणे रस्ता, देवगड - धालवली फणसगाव रस्ता, देवगड - पडवणे पाल्येवाडी रस्ता, कुडाळ - निवजे ओझरवाडी रस्ता, सावंतवाडी - नेतर्डे डोंगरपाल रस्ता, सावंतवाडी - आजगाव तिरोडा रस्ता, वैभववाडी - लोरे गडमठ रस्ता, वैभववाडी - कुसुर डीगशिवाडी रस्ता असे हे महत्त्वाचे नऊ रस्ते मंजूर करण्यात आलेले आहे.

rapan bottom