Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'बायना का आयना' नाटकाने उभे केले 'रेड लाईट' दुनियेचे वास्तव 

'बायना का आयना' नाटकाने उभे केले 'रेड लाईट' दुनियेचे वास्तव 

कुडाळ मधील प्रयोगाला उत्सुफूर्त प्रतिसाद

डॉ. रुपेश धुरी यांच्या अर्ज पुस्तकावर आधारित संवदेनशील कलाकृती

निलेश जोशी | कुडाळ : मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉ रुपेश पाटकर यांच्या अर्ज पुस्तकावर आधारित महेश सावंत पटेल लिखित व दिग्दर्शित दोन अंकी सामाजिक नाटक 'बायना का आयना या वेश्याव्यवसायवर प्रकाशझोत टाकताना आजचं वास्तव चित्रण या सामाजिक नाटकातून दाखवण्यात आले आहे समाज प्रबोधन करणारी एक सुंदर कलाकृती सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने कुडाळ येथे रविवारी रात्री साकारली. हे नाटक पुन्हा एकदा कुडाळ मध्ये होण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी ऍड. राजीव बिले यांनी सांगितले.
    कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील सामाजिक कार्य करणाऱ्या सविता आश्रम संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संदीप परब यांच्या पुढाकाराने समाजात एक सामाजिक जाणीव निर्माण करणारे एक ज्वलंत सत्य एक आर्त..स्त्रीच्या अस्तित्वाचा आवाज उलगडणाऱ्या बायना का आयना या सामाजिक नाटकाचे आयोजन सिमेन्स सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने मराठा समाज हॉल येथे रविवारी रात्री (ता25)केले होते. ऍड. राजीव बिले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संदीप परब, पत्रकार बंड्या जोशी, नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत पटेल आणि कलाकार उपस्थित होते.  वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांच्या जीवनातील वेदना, संघर्ष, आणि स्त्री असण्याची खरीखुरी व्यथा या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे
     वेश्या व्यवसाय बाबत घडणाऱ्या गोष्टी याबाबत समाज प्रबोधन करणारे हृदयस्पर्शी नाटक बायना का आयना हे नाट्य रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन सामाजिक प्रबोधन करण्यासाठी निश्चितच उद्युक्त करणारे ठरले आहे.  आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना वेश्याव्यवसाय अजूनही आहे.  हा व्यवसाय करणाऱ्या महिलेला भावना असतात.  वेदना आहेत.  त्या वेदना त्या समाजासमोर आणण्यासाठी या नाटकातून दाखवण्यात आले आहे.   बायना या वस्तीवर प्रकाशझोत टाकताना वेश्या व्यवसायाला महिलेला कसे सामोरे जावे लागते तिची पावलोपावली कशी फसवणूक होते याचे वास्तव चित्रण लेखकाने या ठिकाणी उभे केले आहे.
      एकूणच अतिशय सुंदर कलाकृती सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने साकारली आहे.  सूचक  नेपथ्य, योग्य प्रकाश  योजना आणि प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत त्याच बरोबर सर्वांच्या अभिनयाने कसलेले  हे सामाजिक नाटक  समाजाचे प्रबोधन करणारे आहे.  विशेष म्हणजे 25 ते 30 कलाकार एकाच  रंगमंचावर एकत्र वावरताना कुठेही  कलाकार कमी पडत नाहीत.  परफेक्ट टाइम आणि संवाद या नाटकाचे विशेष म्हणावे लागेल.
     लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी महेश मधुकर सावंत-पटेल यांनी सांभाळली आहे. पार्श्व संगीत  आनंद कुबल, प्रकाश योजना: चेतन पवार, नेपथ्य: शरद कांबळी आणि बंधू, रंगभूषा : पी. कुमार, वेशभूषा महादेव गेजगे, रंगमंच व्यवस्था आनंद कडू, समिन-माने अनिल वैती यांची आहे. या नाटकात सतीश देसाई, विद्या पाटील, आम्रपाली, प्रियांका, आराध्या म्हस्के, अनिल वैती, आनंद कडू, मयुरी निकम,  सचिन आव्हाड, आरती दौड,  मृणाल भिडे, महादेव गेजगे,  श्रुतिका येसादे, :संजय वाणी  स्नेहल जगताप,  ओमकार नाईक,  अमोल पाटील, शंकर पवार, सिध्देश, भूषण पाटील, साईप्रसाद मेस्त्री, अजय पाटील, मनस्वि सरपोळे, महेश जरांडे,  प्रमोद कांबळे,  गोगेश राज फेटे,  मानसी भावसार या सर्व कलावंतांनी आपआपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला
   सर्वच रसिकांनी या नाटकांचे कौतुक केले. ऍड. राजीव बिले म्हणाले, वेश्या व्यवसायावर प्रकाशझोत टाकणारे समाज प्रबोधन करणारे हे नाटक समाजाच्या एका घटकावर हे नाटक  करमणुक म्हणून न बघता ज्या विशिष्ट घटकावर आवाज उठवला आहे, यातून समाज प्रबोधन झाले ते उत्कृष्टरित्या या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे. वेश्या व्यवसाय हा फार जुना प्रश्न आहे.  केवळ महिला आवड म्हणून या व्यवसायाकडे वळत नाहीत तर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी याकडे वळवले जाते आणि त्या या व्यवसायाचे लक्ष्य बनतात.  मनाला भावणारे नाटक असून जे याचा फायदा घेतात ते कधीच दोषी ठरत नाहीत.  यामध्ये महिलांनाच दोषी ठरवले जाते.  खूपच छान नाटक साकारण्यात आले.  पुन्हा या नाटकाचा प्रयोग कुडाळमध्ये घेतला जाईल असे अँड राजीव बिले यांनी सांगितले.  रंगकर्मी बंड्या जोशी यांनी देखील या नाटकाचे कौतुक करून सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
      लेखक दिग्दर्शक महेश सावंत पटेल यांनी हा आमचा दहावा प्रयोग असून सामाजिक विषय घेऊन समाज प्रबोधन करण्यासाठी आमची संस्था काम करत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व सावंतवाडी येथे दोन प्रयोग झाले पाऊस असूनही नाट्यरसिकांनी या नाटकाला उपस्थिती लावली याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्रकार अजय सावंत, नृत्यांगना मृणाल सावंत, उमेश परब आदी ऊपस्थित होते.

rapan bottom