Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार

दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार

राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार

दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीत सकारात्मक निर्णय

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी  कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना यश आले नव्हते. याप्रश्नी कलाकारांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्या बाबत सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान, सोमवारी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक संपन्न झाली.

सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी, त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे, तसेच वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनांमध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली.

मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असून माझ्या जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने ताबडतोब दखल घेऊन कलाकारांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलेट प्रोजेक्ट सिंधुदुर्ग पासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.

त्याचप्रमाणे याबाबत शासन निर्णयामध्ये देखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना देखील मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांना देखील राजश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे.

या बैठकीसाठी दत्तमाऊली संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई, पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री पुरुषोत्तम कोचरेकर, कला दिगदर्शक रुपेश नेवगी, दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबई अध्यक्ष आशिष कमलाकर गावडे, राजाराम धुरी, श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मुंबई सल्लागार विश्राम धुरी, शिवसेना नेते दादा साईल, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.

rapan bottom