Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच

देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या समस्या मार्गी लावताना दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून वाडीतील पाण्याचा व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला : ग्रामस्थ

मालवण : विकासाचे व्हिजन असलेले आमदार निलेश राणे यांच्या गतिशील विकास कार्यावर प्रेरित होऊन तसेच 'देऊ तो शब्द पुर्ण करू' या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीला प्रेरित होऊन मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला.

अनेक वर्षांपासून वाडीत असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दत्ता सामंत यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काम सुरु केले. तसेच वाडीला जोडणारा रस्ताही करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेणारे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतं असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, देवली उपसरपंच हेमंत चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, रामू चव्हाण, मेघा पाटकर, मंदार लुडबे यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्ते ग्रामस्थ

देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच दिलीप देऊलकर, प्रभाकर देऊलकर, रघुनाथ देऊलकर, विजय देऊलकर, प्रदीप देऊलकर, जितेंद्र देऊलकर, महादेव देऊलकर, रवींद्र देऊलकर, प्रदीप देऊलकर, प्रसन्न देऊलकर, तेजस देऊलकर, सुनील देऊलकर, यशवंत देऊलकर, विनायक देऊलकर, सचिन देऊलकर, योगेश देऊलकर यांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

rapan bottom