'त्या' समस्या मार्गी…
मालवण : पावसाळी आपत्ती काळात दरवर्षी प्रमाणे माजी नगरसेवक यतीन खोत हे सेवाकार्यासाठी ऑन फिल्ड 24 तास कार्यरत दिसून येत आहेत. मात्र मी मोठे काही करतं नाही प्रभागातील जनता हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांची सेवा हे मी माझे भाग्य समजतो. कोणतेही मोठे पद, प्रतिष्ठा यापेक्षा जनतेचा सेवक हेच पद माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे यतीन खोत सांगतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पडझड व अन्य घटनानी काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. झाडे पडून तसेच वीज तारा व वीज खांब कोसळून मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी अनेक तास वीजपुरवठा खंडित होता. काही ठिकाणी तारा तुटून, फ़ांद्या पडून घरगुती वीज कनेक्शन वीज पुरवठा ठप्प होता. किनारपट्टी भागात असलेल्या त्यांच्या प्रभागात काही ठिकाणी वीज समस्या अधिक होत्या. माजी नगरसेवक यतीन खोत हे गेले पाच दिवस सातत्याने प्रभागात कार्यरत राहून वीज कर्मचारी यांच्या मदतीने वीज समस्या सोडवून घेत आहेत. तसेच काही ठिकाणी झाडाच्या फ़ांद्या कोसळ्यल्या. यातील काही ठिकाणी यतीन खोत स्वतः कार्यरत दिसून आले. ऑन फिल्ड 24 तास त्यांचे कार्य सुरूच होते.

पावसाळी काळात वारे, पाऊस यामुळे जास्त समस्या निर्माण असतात त्यामुळे अलर्ट राहावेच लागते. यात वीज वितरण कर्मचारी, पालिका कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली. जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात आल्या. मात्र पाऊस सुरूच असल्याने पडझड होत राहते. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतीही समस्या असल्यास प्रशासन तसेच मला संपर्क साधावा. असे आवाहन यतीन खोत यांनी केले आहे.
हा अवकाळी पाऊस आहे, त्यात जनजिवन विस्कळीत बनले. मान्सून यायचा आहे. त्यामुळे पालिका प्रशासन यांनी मान्सून पुर्व कामे योग्य पद्धतीने करून घ्यावीत. काही सखल भागात पाणी जमा होते याचा विचार करता उपाययोजना साठी तयार राहावे. वीज व आपत्ती विभागानेही तत्पर असावे. आम्ही सोबत असणारच. मात्र कोणत्याही नागरिकाला त्रास सहन करावा लगता नये. यंत्रणा तयार असावी असे आवाहनही यतीन खोत यांनी प्रशासनास केले आहे.

