Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दीपक पाटकर म्हणजे 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' !

दीपक पाटकर म्हणजे 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' !

भर पावसातही अखंडित सेवाकार्य सुरूच : 'त्या' वीज समस्या वीज कर्मचारी यांच्या मदतीने तात्काळ सोडवल्या

मालवण : आम्हाला राणे साहेबांची शिकवण आहे. जनतेची सेवा हेच आपले कर्तव्य आणि प्राधान्य असले पाहिजे. असे सांगत हाच गुरुमंत्र घेऊन मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर सातत्याने जनसेवेत दिसून येतात. मालवणात गेले काही दिवस संततधार पाऊस कोसळत असून भर पावसातही दीपक पाटकर यांचे सेवाकार्य अखंडीत दिसून येत आहे.

काही पडझड होऊन नुकसान झाले त्याठिकाणी मदत कार्यात दीपक पाटकर होते. पाऊस व वारा यामुळे अनेक ठिकाणी वीज समस्या निर्माण झाल्या. वीज कर्मचारी सातत्याने सेवेत आहेत काम सुरु आहे. त्यांना दीपक पाटकर यांचे आवश्यक सहकार्य मिळतं आहे. जनतेच्या वीज तक्रारी लवकर सोडवण्यात मदत होत आहे. अश्याच प्रकारे मालवण धुरीवाडा पडवळ गल्ली मार्गांवर वीज खांबांना मोठया प्रमाणात झाडी व वेलीनी जखडून ठेवले. वीज तारांवर या वेली गेल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, स्ट्रीट लाईट बंद पडणे या समस्या येत होत्या. याबाबत माहिती स्थानिक नागरिकांनी वीज वितरण तसेच माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

दीपक पाटकर यांनी त्वरित वीज कर्मचारी तसेच मालवण पालिकेचा जेसीबी बोलावून झाडे वेली हटवून वीज खांब बाजूचा परिसर मोकळा केला. तसेच वीज कर्मचारी यांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करून दिला.

आदर्शनगर येथील वीज समस्याही मार्गी

शहरातील रेवतळे आदर्श नगर मार्गांवर वीज तारा झाडांना घासून स्पार्किंग होत होते तसेच वीज पुरवठाही खंडित होत होता. नागरिकांची ही समस्याही दीपक पाटकर यांनी वीज कर्मचारी यांना त्वरित बोलावून सोडवून दिली. यावेळी भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण हे ही उपस्थित होते. वीज समस्या मार्गी लागल्याने धुरीवाडा व आदर्शनगर येथील नागरिकांनी दीपक पाटकर तसेच वीज वितरणचे आभार मानले. आमच्या एका फोनवर दीपक पाटकर यांनी त्वरित येऊन वीज कर्मचारी यांच्या माध्यमातून वीज समस्या सोडवली. दीपक पाटकर म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यसम्राट नेतृत्व आहे. असे नागरिकांनी सांगितले.

जनतेची सेवा हे आमचे कर्तव्य

नागरिकांनी आभार व्यक्त केले असता दीपक पाटकर म्हणाले, हे आमचे कर्तव्य आहे. खा. नारायण राणे साहेब यांची हीच शिकवण राहिली. त्यानुसार कार्यरत असताना आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom