मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शनिवारी सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रशांत हिंदळेकर, साईश्रद्धा मोबाईल शॉपीचे मालक दीपक हिंदळेकर यांच्या त्या मातोश्री होय.

सौ. स्वाती विलास हिंदळेकर यांचे निधन
