Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ नगराध्यक्षांसह नगरसेवक पाण्यासाठी ऍक्शन मोड वर

कुडाळ नगराध्यक्षांसह नगरसेवक पाण्यासाठी ऍक्शन मोड वर

पाईपलाईन नादुरुस्त असलेल्या वॉर्डात स्वखर्चाने केला पाणीपुरवठा

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखवून आपल्या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी स्वखर्चाने तात्काळ पाणीपुरवठा केला.
कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी पाईपलाईन भैरववाडी येथे फुटली. गेले पाच दिवस त्या ठिकाणी नगरपंचायतीचे कर्मचारी काम करत आहेत. ही पाईपलाईन आज (शुक्रवारी) सायंकाळी दुरुस्त झाली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील पाणीपुरवठा शनिवार २४ मे पासून सुरळीत सुरू केला जाईल अशी माहिती देण्यात आली. दरम्यान गेले पाच दिवस पाणी पुरवठा बंद असल्यामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखविली.


काल (गुरुवारी) रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आवश्यक असलेल्या नागरिकांना नगरसेवक विलास कुडाळकर यांनी टॅंकरने पाणीपुरवठा केला. आज (शुक्रवारी) नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी माठेवाडा, प्रभावळकर वाडा, बाजारपेठ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मज्जिद मोहल्ला, मच्छी मार्केटमध्ये असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणीपुरवठा केला. तर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर, कुडाळेश्वरवाडी अशा ठिकाणी स्वखर्चातून पाणीपुरवठा केला. त्यांच्या समवेत गटनेता विलास कुडाळकर, शहर प्रमुख रोहित भोगटे, राकेश कांदे, आबा धडाम उपस्थित होते

rapan bottom