आमदार निलेश राणे यांचे नागरिकांना आवाहन
मालवण | प्रतिनिधी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि बचाव पथक तयार स्थितीत आहेत.
२३ व २४ मे रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, नागरिकांनी सतर्क राहावे. प्रवास टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असे आवाहन कुडाळ-मालवण मतदारसंघ आमदार निलेश राणे यांनी केले आहे.

