Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प

चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प

तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी : चौके माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांची लक्षवेधी मागणी

मालवण | प्रतिनिधी : चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी लक्षवेधी मागणी चौके गावचे माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा अधिक दर्जेदार व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे प्रयत्नशील आहेत. अनेक टॉवर त्यांनी मंजूर करून घेतले. जनतेला दर्जेदार सेवा मिळावी यासाठी खासदार नारायण राणे साहेब सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे असताना संबंधित प्रशासनानेही गतिमान होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील सेवा काही समस्यांमुळे ठप्प होत असेल तर त्याबाबत त्वरित उपाययोजना गरजेच्या आहेत. चौके परिसरातील बीएसएनएल सेवा त्वरित सुरु करावी. अन्यथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे राजा गावडे यांनी बीएसएनएल मालवण तालुका प्रशासनाला सूचित करताना सांगितले

rapan bottom