Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दुकानवाड पूल अद्यापही अर्धवट; ऐन पावसात ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या

दुकानवाड पूल अद्यापही अर्धवट; ऐन पावसात ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या

पाण्याखाली जात असल्याने कॉजवेचा पर्यायही कुचकामी

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यात गेले चार दिवस अचानक सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. माणगांव शिवापूर मार्गावरील सुमारे साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम अपूर्ण राहिले, तर येथील जुन्या कॉजवेवर पहिल्याच पावसात पाणी आल्यामुळे दुकानवाडच्या पुढील पाच गावांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसात दुकानवाड येथील जुन्या कॉजवेवर पाणी आल्याने या भागातील ग्रामस्थांवर चिंतेचे सावट पसरले आहेत.
माणगाव शिवापूर या मुख्य मार्गावर सुमारे साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे काम दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. सुरुवातीला ठेकेदारने चांगल्या पद्धतीने पुलाच्या कामाला गती दिली, मात्र अलीकडे गेले पंधरा दिवस पुलाचे काम काहीअंशी संथगतीने सुरू राहिले. अशातच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे कर्ली नदी प्रवाहित झाली. ते पाणी जुन्या कॉजेवरून वाहू लागले. नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे त्या पुलावरून वाहतूक होणे अशक्यच आहे, परिणामी जुन्या कॉजवेचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र जुन्या कॉजवेच्या वरच्या बाजूला नवीन पुलाचे बांधकाम व त्या पुलाच्या बांधकामाचे भराव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जुना कॉजवे वारंवार पाण्याखाली राहणार आणि दुकानवाड कॉजेवेच्या पलीकडे असणाऱ्या शिवापूर, वसोली, आंजिवडे, उपवडे, साकिर्डे या गावातील लोकांची पायपीट निश्चित मानली जात आहे. यामध्ये शाळकरी मुले, महिला व वृद्धांचे हाल होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

rapan bottom