मिली मिश्रा | कणकवली : कणकवलीतील बालगोपाळ न हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सोमवार २६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बालगोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनी जयंतीनिमित्त आयोजित या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी अनिल अणावकर, योगेश जावकर, बाळू वालावलकर (९३०९१३१२७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
