Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कामगारांना कल्याणकारी योजना देणे हे आपले कर्तव्य - आम. निलेश राणे

कामगारांना कल्याणकारी योजना देणे हे आपले कर्तव्य - आम. निलेश राणे

कुडाळमध्ये कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण

निलेश जोशी | कुडाळ : कामगार आपल्याकडे कधी काही मागत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण कार्यक्रमावेळी ते कुडाळ येथे बोलत होते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला याचे आयोजन सिंधुदुर्ग स्वाभिमानी कामगार संघाच्या वतीने कुडाळ येथे करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बावले, स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे, कामगार सेनेचे जिल्हा सचिव मंगेश चव्हाण, जिल्हा संघटक अशोक बावलेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शहर प्रमुख रोहित भोगटे उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कामगारांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजना त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात लाभ देणारे आहे. त कामगारांच्या मुलाच्या लग्नात असो किंवा कामगाराच्या मृत्यूपर्यंत असो ही योजना प्रत्येक क्षणाला साथ देणारी आहे. त्यामुळे ही योजना अजून दुर्लक्षित असलेल्या कामगारांपर्यंत घेऊन जाणे हे प्रत्येकाचे काम आहे. कामगार कधीच आपल्याकडे काही मागत नाही. या योजनेच्या माध्यमातून आपण कामगारांना सक्षम बनवणे हे आपले कर्तव्य आहे. अजून काही योजना आहेत त्या संदर्भातही लवकरच आयुक्तांसोबत संघटनेची बैठक घेऊन या संयोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार निलेश राणे यांनी सांगून आम्ही सुद्धा कामगार संघटनांमध्ये काम केलेले आहे, त्यामुळे कामगारांची दुःख काय असतात हे आम्हाला माहित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी कुडाळ तालुक्यातील एकूण १ हजार ४०० कामगारांना तीन दिवसांमध्ये हे साहित्य वाटप केले जाणार आहे. या वितरणाचा कार्यक्रम कुडाळ येथे झाला. यामध्ये ६३९ कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले अशी माहिती सिंधुदुर्ग स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.

rapan bottom