Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भुईबावडा घाटात धबधबे प्रवाहीत!

भुईबावडा घाटात धबधबे प्रवाहीत!

पहिल्याच पावसात धबधबे प्रवाहित; पावसाची रिपरिप सुरूच

पंकज मोरे | वैभववाडी: निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या निसर्गरम्य भुईबावडा व करुळ घाटातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांना मोहिनी घालणारा भुईबावडा व करुळ घाटमार्गाची ओळख आहे. सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात धबधबे प्रवाहीत झाले आहेत.


तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भुईबावडा व करुळ घाटातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार पर्वतरांगा त्यावर पांघरलेल्या धुक्याचा दाट थाट, उंच कड्याकपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगेतून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता. घाटामार्गातून अंगाला फडफड झोंबणारा वारा, त्यातूनच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी दोन्ही घाटात हजारो पर्यटक येत असतात.


भुईबावडा घाटमार्ग ११ कि. मी. अंतराचा असून या घाटमार्गात अनेक छोटे मोठे धबधबे हे पावसाळ्यात ओसंडून वाहतात. भुईबावडा घाट हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला घाटमार्ग आहे. मात्र घाटमार्ग अरुंद असल्याने पर्यटकांना अतिशय काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा लागतो. करुळ घाटमार्गात पर्यटकांना उभे राहण्यासाठी पिकनिक पॉइंट आहे. त्याचप्रमाणे भुईबावडा घाटात असा पॉईंट विकसित करणे गरजेचे आहे.
भुईबावडा घाटमार्गाप्रमाणेच करुळ घाट मार्गातील उंच कड्याकपारीतून छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. भुईबावडा व करुळ हे दोन्ही घाट वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे पर्यटनदृष्ट्या तितकेच महत्त्वाचे आहेत. विशेषतः पावसाळी पर्यटनाला या घाटांना खूपच महत्त्व आहे.

rapan bottom