Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने खुली निबंध स्पर्धा


आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्ताने स्पर्धा आयोजन


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्यावतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त खुल्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "सहकार" ही संकल्पना केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नाही, तर ती माणसांना माणसांशी जोडणारी, एकमेकांच्या दुःख-सुखात सहभागी होणारी आणि ग्रामीण भारताच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारी प्रेरणादायी चळवळ आहे. याच सहकार तत्वांना उजाळा देण्यासाठी, तसेच सामाजिक जाणिवा समृद्ध करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरीच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ साजरे करताना खुल्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे व उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी दिली.


ही स्पर्धा कोणत्याही वयोगटातील व पार्श्वभूमीतील नागरिकांसाठी खुली असून, सहकार विषयक चिंतन, अनुभव, इतिहास, आणि भविष्यातील दिशा या पैलूंवर आधारित सर्जनशील विचारांना वाव देणारी आहे.
स्पर्धेची माहिती खालीलप्रमाणे आहे.

स्पर्धेचे विषय- 1) सहकार: ग्रामीण भारताचा आत्मा – काल, आज आणि उद्या”.
2) समृद्ध भविष्यासाठी सहकार शाश्वत विकासाची दिशा (या दोनपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा.)
शब्दमर्यादा: 2500 शब्द असेल.निबंध स्वहस्ताक्षरात अथवा टंकलेखन स्वरूपात स्वीकारला जाईल.निबंध सादर करण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५ राहील.


निबंध सादर करण्याचे ठिकाण: प्रधान कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्या., सिंधुदुर्गनगरी हे आहे.
या स्पर्धेमुळे सहकार क्षेत्रातील भूमिका समजून घेण्यास मदत होणार असून, नवे विचार, नवी दृष्टी आणि प्रेरणादायी वाटचाल यांचा संगम घडणार आहे. प्रथम तीन विजेत्या निबंधांना अनुक्रमे १००१/-,७०१/- व ५०१/- अशी रोख पारितोषिके,आकर्षक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी श्री. किशोर कदम (तज्ज्ञ संचालक) संपर्क: ९४२२९६३६५५ यांचेशी संपर्क साधावा. इच्छूक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे , उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी संस्थेच्यावतीने केले आहे

rapan bottom