आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त उपक्रम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त रक्तदान शिबिर व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील रुग्णांना फळे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त प्राथमिक शिक्षक पतपेढीने विविध उपक्रम हाती घेतले असून यामध्ये सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम रविवार दि.२५ मे रोजी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे व उपाध्यक्षा ऋतुजा जंगले यांनी दिली आहे

