Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मॉन्सून काळात सतर्क राहा - प्राजक्ता बांदेकर

मॉन्सून काळात सतर्क राहा - प्राजक्ता बांदेकर

कुडाळ नगराध्यक्षानी घेतला आढावा

निलेश जोशी | कुडाळ : मॉन्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मॉन्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले.
      मॉन्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात. त्यामुळे मॉन्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, तसेच नगरपंचायतीचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, लेखापाल स्वप्निल पाटील, नळ पाणी योजनेच्या नाडकर्णी, वैद्यकीय अधिकारी शुभम बोरवाडे, राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता रोहित गवस, एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश रेवणकर, विद्युत वितरण कंपनीचे प्रकल्प येळगुकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी गजानन पेडणेकर उपस्थित होते.
     या बैठकीमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विद्युत तारांवर आलेली झाडे तोडण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यालगत असलेले गटार साफ करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. तसेच महामार्गावरील ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर येतं त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात. अशा सूचना करून सतर्क रहावे असे सांगण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या, की संभाव्य साथरोग तसेच कोरोना प्रादुर्भाव संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये दिरंगाई चालणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्यांनी या काळामध्ये कोठेही जाऊ नये. जेव्हा आपत्ती निर्माण होईल त्या ठिकाणी तात्काळ येण्यासाठी प्रत्येकाने सतर्कता दाखवली पाहिजे, असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.

rapan bottom