Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वादळी पावसाने नांदरुख गावात मोठे नुकसान

वादळी पावसाने नांदरुख गावात मोठे नुकसान

झाडे कोसळून घरांचे नुकसान

वाऱ्याने घरांचे पत्रे उडाले

वीज खांब व वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा ठप्प

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसराला मंगळवारी वादळी पावसाचा तडाखा बसला. वीजचा लखलखाट व गडगडाटासह रात्रभर संततधार पाऊस सुरु होता. यात अनेक ठिकाणी पडझडिमुळे नुकसान झाले आहे. नांदरुख गावात झाडे कोसळून घरांचे तसेच विज साहित्याचे मोठे नुकसान झाले.

नांदरुख घरटणवाडी येथील अनुप दिलीप घाडी, राजेश रमेश घाडी, श्रीमती सुहासिनी विठ्ठल परब यांच्या घराच्या छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच दिगंबर विठोबा घाडी व सुनील शंकर चव्हाण यांच्या घरावर फणसाचे झाडं कोसळून नुकसान झाले. दरम्यान वेगवान वाऱ्यात घाडी यांच्या घराचे पत्रे सुमारे 200 ते 300 मिटर अंतरावर जाऊन पडले होते. पटेलवाडी येथे धानाजी मधुकर चव्हाण यांच्या घराशेजारी झाडे कोसळून वीज वाहिन्या तुटून नुकसान झाले होते.

नांदरुख गावात अनेक ठिकाणी वीज खांब व वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित होता. तसेच काही मार्गांवरील झाडे पडल्याने वाहतूक ठप्प होती. प्रदीप चव्हाण व काही ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला. नुकसानीची माहिती समजताच सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी महेंद्र मोरे, नांदरुख कोतवाल स्वप्नील साळकर यासंह अन्य उपस्थित होते. दरम्यान, या नुकसानीबाबत माहिती देऊनही तहसील विभागाचे कर्मचारी पंचनाम्यासाठी न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

फोटो : वादळी पावसाने नांदरुख गावात पडझड होऊन मोठे नुकसान झाले. (अमित खोत, मालवण)

rapan bottom