रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मालवण यांच्या वतीने आयोजन
मालवण : मालवण शहरातील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 23 मे रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न होणार आहे.
या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. हाडांची घनता तपासणी, रक्तातील साखर इसीजी (कार्डिओग्राम), एक्स-रे आवश्यक असल्यास त्यासाठी शिबीर अंतर्गत एक्स-रे 50 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत, तज्ञ फिजिओथेरपिस्ट कडून फिजिओथेरपीबाबत मोफत सल्ला दिला जाणार आहे.

तरी मोफत तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा, असे आवाहन रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

