Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

Malvan | वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी MSEB कार्यरत : आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात

Malvan | वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी MSEB कार्यरत : आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात

लवकरच वीज पुरवठा सुरु होईल

उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे मालवणसह अनेक भागांत नुकसान झाले. वीज खांब व तारा तुटून नुकसान झाले. सबस्टेशन मालवण, आचरा, कुंभारमठ,  पेंडुर या माध्यमातून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम MSEB गतिमान रित्या मार्फत सुरु आहे. आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात असल्याचे मालवण उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.

सब स्टेशनला काही ठिकाणी जनरेटर व अन्य काही साधनाची तातडीने आवश्यकता होती त्याबाबत आमदार निलेश राणे यांनी सहकार्य केले आहे. असे सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.


दरम्यान, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तसेच संततधार पाऊस यामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. तळेबाजार, आचरा सबस्टेशनं मार्गे येणारा पुरवठा सुरु होत आहे. कुडाळ येथून येणाऱ्या मार्गांवर वीज खांब कोसळून व तारा तुटून मोठे नुकसान झाले. तेही पूर्ण करण्याचे काम प्रगतीत आहे. Mseb कडून काम सुरु असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत केला जाईल. असे सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.

rapan bottom