समस्त मांजरेकर बंधू व परिवार
मालवण : मालवण शहरातील रेवतळे येथील समस्त मांजरेकर बंधू व परिवार यांची कुलस्वामिनी श्री देवी महालक्ष्मी देवीचा गोंधळ 20 मे रोजी श्री महालक्ष्मी देवघर , रेवतळे येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी 5 वाजता 5 घरात जोगवा मागणे आणि तळी घेणाऱ्यांची ओटी भरणे, सायंकाळी 8:30 वाजता श्री महालक्ष्मी देवीचा मांड मांडणे कार्यक्रम त्यानंतर रात्रौ 9 वाजता मशाल पेटवणे व नंतर दिवटीवर समस्त मांजरेकर बंधू आणि आलेल्या सर्व भाविकांनी तेल घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला प्रसाद दाखवून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. रात्रौ 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत श्री महालक्ष्मी देवीच्या गोंधळा संबंधी देवीचा जागर व तसबीर खुनेचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार दि. 22 मे रोजी शुद्धीकरण होम व महाप्रसाद व रात्री स्थानिकांचे संगीत भजन होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मांजरेकर बंधू व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

