सिंधुदुर्गच्या हिताच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांचे अनेक महत्वपूर्ण निर्णय
सिंधुदुर्ग पर्यटनाला ही मिळणार नवी दिशा
मिली मिश्रा | सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे म्हणजे जे काम अशक्य असेल ते करण्याची धमक असे म्हटले तर वावगे नाही. दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे नितेश राणे होय.
झी सिने अवॉर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. याची अधिकृत घोषणा झी व्यवस्थापनाकडून करण्यात आली. नक्कीच ही एका दिवसात घडलेली घटना नाही. ज्या वेळेला २३ व्या झी सिने अवॉर्ड्स कार्यक्रमाला नामदार नितेश राणे उपस्थित होते, तेव्हापासूनच त्यांनी सिंधुदुर्गात हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून यश साध्य ही झाले आणि आज त्याचे अधिकृत घोषणा करण्यात आली.
या घोषणे दरम्यान स्क्रीनवर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच सिंधुदुर्गातील अनेक सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्यात आले. ही बातमी समजताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले असून हा कार्यक्रम नेमका कोठे व कधी होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

स्थानिक नागरिक व पर्यटन व्यवसायिकांच्या मते सिंधुदुर्गात झी सिने अवॉर्ड सारखा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम आयोजित करून पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी पर्यटन क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त होत आहेत.
राज्यात मंत्री म्हणून नितेश राणे यांची कामगिरी दमदार ठरली आहे. तर सिंधुदुर्ग पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरीअग्रेसर आणि आदर्शवत जनहिताची ठरत आहे. पालकमंत्री हे तुम्हीच करू शकता.

