Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मारहाणीच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

मारहाणीच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

निलेश जोशी | कुडाळ : जबर मारहाण करून फिर्यादीच्या दोन्ही हातापायांना दुखापत होऊन डोक्याला मुका मार लागल्याचा आरोप असलेले आरोपी गणेश तुकाराम भोसले, शंकर गणपत मयेकर आणि ओंकार गणेश भोसले यांची कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड. राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर व अॅड. दत्ताराम बिले यांनी काम पाहिले.
याबाबत ऍड. राजीव बिले यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहिती नुसार, दिनांक २०/०१/२०२१ रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास शुभम शेखर भोगटे राहणार पावाशी यांची पुतणी स्पृहा भोगटे पाटाच्या पाण्यात खेळत असताना आरोपी ओंकार गणेश भोसले हा मोटरसायकल घेऊन आला आणि त्यांने ती मोटरसायकल फिर्यादी शुभम शेखर भोगटे यांचे पुतणीच्या अंगावर घातली. त्यामुळे शुभम शेखर भोगटे आणि ओंकार गणेश भोसले यांचेत बाचाबाची झाली. त्या रागाने मुंबई गोवा महामार्गावर आरोपी गणेश तुकाराम भोसले, शंकर गणपत मयेकर आणि ओंकार गणेश भोसले यांनी फिर्यादी शुभम शेखर भोगटे याचा मोटरसायकल वरून पाठलाग केला आणि मुंबई गोवा महामार्गावर भंगसाळ पुलाचे नजीक आरोपीने फिर्यादीच्या मोटरसायकलला ठोकर मारली व सर्व आरोपींनी बांबूच्या काठीने फिर्यादीला जबर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या दोन्ही हातापायांना दुखापत होऊन डोक्याला मुका मार लागला म्हणून कुडाळ पोलीस स्टेशन येथे आरोपी गणेश तुकाराम भोसले, शंकर गणपत मयेकर आणि ओंकार गणेश भोसले यांचे विरुद्ध तक्रार दिली होती.
त्यां तक्रारीवरून पोलिसांनी भा.द.वि. कलम ३३६, ३३७, ३२४, ५०४, ५०६, सह ३४ अन्वये तक्रार दाखल करून घेतली. आणि सर्व आरोपीच्या विरोधात कुडाळ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठविले होते. या कामात आरोपी शंकर गणपत मयेकर याची मोटरसायकल जप्त केली होती. सदर केस कुडाळ न्यायालयामध्ये चालली असता या केसचे कामी अॅड. राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर व अॅड. दत्ताराम बिले यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे युक्तिवाद करत असताना आरोपीचे वकिलांनी वैद्यकीय दाखल्यातील त्रुटी आणि तपास कामातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता कुडाळ न्यायालयातील न्यायाधीश श्री. पी. आर. ढोरे यांनी केली. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom