Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

चंद्रसेन पाताडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

चंद्रसेन पाताडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रसेन कृष्णा पाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्षपदी अनेकांना संधी मिळावी, या हेतूने या पतपेढीवर निवडून आलेल्या सत्ताधारी सभासदांपैकी प्रत्येकाला अध्यक्षपदाची एक वर्षाची संधी दिली जाते. पहिल्या वर्षी नारायण नाईक, दुसऱ्या वर्षी विजय सावंत तर या टर्मच्या तिसऱ्या वर्षी चंद्रसेन पाताडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संस्थेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयात अध्यासी अधिकारी सुनील मरभळ (सहाय्यक उपनिबंधक, कुडाळ) यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा ऋतुजा जंगले, संचालक संतोष मोरे, नारायण नाईक, संतोष राणे, संजय पवार, श्रीकृष्ण कांबळी, सीताराम लांबर, मंगेश कांबळी, सचिन बेर्डे, महेंद्र पावसकर, समीक्षा परब, तज्ज्ञ संचालक किशोर कदम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर नातू, मनोज सावळ, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

निवडीनंतर संघटना पदाधिकारी राजन कोरगावकर, भाई चव्हाण, विठ्ठल गवस, तुषार आरोसकर, दादा जांभवडेकर, सुरेखा कदम, निकिता ठाकुर, नंदकिशोर गोसावी, प्रशांत मडगावकर, संतोष कुडाळकर, रफिक बोबडे, सुगंध तांबे, किशोर गोसावी, विनायक जाधव, ईश्वरलाल कदम, गोपाळ गावडे, दिनेश जंगले, प्रवीण ठाकर, तालुका पदाधिकारी विवेकानंद कडू, सुशांत मर्गज, नीलेश ठाकुर, शशांक आटक, महेश गावडे, शैलेंद्र न्हावेलकर, राजेंद्रप्रसाद गाड, नंदकिशोर पाडगावकर, प्रसाद जाधव, महेश काळे, हेमंत सावंत, आप्पा सावंत, संतोष तेरसे, श्रीकृष्ण सावंत, प्रदीप सावंत, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सामाजिक संघटना पदाधिकारी सुजित जाधव, संजय कदम, नितीन पवार, कृष्णा पाताडे, भाऊ पाताडे, सुनील पाताडे, दीपक पाताडे, विजय पाताडे, मनोहर पाताडे, प्रसाद पाताडे, नितीन पाताडे, ललित पाताडे, अमित चव्हाण, रत्नागिरी शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका प्रांजली धामापूरकर, दीपक धामापूरकर आदींनी तसेच अन्य सहकारी मित्र परिवार शिक्षक पतपेढीत उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिक व सचोटीने पार पाडून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी चंद्रसेन पाताडे यांनी स्पष्ट केले.

अमित खोत | मालवण

rapan bottom